
मराठा योद्धय़ांच्या लढाचा प्रेरणीदायी इतिहास असलेल्या पानिपत येथील स्मारकामध्ये ऐतिहासिक युद्धाबाबतची सविस्तर माहिती देणारी पुस्तिका, वाचनालय, लाइट ऍण्ड साऊंड शो, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाच्यावतीने हरयाणा सरकारला देण्यात येणार आहे अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दिली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी पानिपत स्मारकाची पाहणी केली होती. या संदर्भात डॉ. नीलम गोऱहे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पुरातत्व विभागाच्या महासंचालक व्ही. विद्यावती यांना निवेदन दिले. त्यानंतर आज डॉ. नीलम गोऱहे यांची व्ही. विद्यावती यांची बैठक झाली.
या स्मारकाची पाहणी केल्यानंतर या पाहणीत आढळलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाले. यात पानिपत स्मारकामध्ये ऐतिहासिक युद्धाबाबत सविस्तर माहिती पुस्तिका व माहितीपत्रके ऊपलब्ध करावी, वाचनालय चालू करावे, प्रकाश योजना व ध्वनी चित्रफीत असलेला साऊंड शो सुरू करावा, सुरक्षेसाठी होम गार्ड व्यवस्था करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व इतर सोयी साठी मान्यता द्यावी अशी सूचना डॉ. नीलम गोऱहे यांनी केली. त्यावर याबाबत हरयाणा प्रशासनास ना हरकत प्रमाणपत्र देऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन पुरातत्व विभागाच्या महासंचालक व्ही. विद्यावती यांनी दिले. त्याबाबतचा प्रस्ताव देण्यास हरयाणाच्या स्थानिक अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत.
एकवीरा-लेण्याद्रीला तत्काळ निधी
याबैठकीत एकवीरा व लेण्याद्री देवस्थानमधील भाविकांसाठी महत्त्वाच्या सोयीसुविधांनामान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. गोऱहे यांनी विनंती केली. त्यास व्ही विद्यावती यांनी तत्काळ निधी दिला जाईल असे यावेळी सांगितले. मुंबईत विधान भवनमध्ये मे महिन्यात महाराष्ट्रातील या विषयासंदर्भात असलेल्या प्रश्नाबाबत बैठक घेऊ व त्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत विनंती व्ही विद्यावती यांनाल केली. त्यावेळी विद्यावती महासंचालक पुरातत्व विभाग यांना डॉ. गोऱहे यांच्या सूचनांचे स्वागत करून महाराष्ट्रातील पुरातत्व विभागाच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पूढील महिन्यात मुंबई मध्ये नक्की बैठक घेऊ व विषय सोडविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन डॉ. गोऱहे यांना दिले.
























































