मुंबईत तणाव निर्माण करण्यात येत आहे; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत जाणूनबुजून तणाव निर्माण करण्यात येत आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. देशातील या दंगली भाजप प्रायोजित असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईत भोंग्याचा मुद्दा उचलून तणाव निर्माण करण्यात येत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केल्याने देशाची अर्थव्यवस्था,रोजगार, व्यापार, उद्योग याला फार मोठा फटका बसत आहे. देशात जे दंगे सुरू आहेत. त्याला देशातील सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. त्यांनी हे दंगे प्रायोजित केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे राऊत म्हणाले. याआधी रामनवमी, हनुमान जयंतीला कधीही दंगे झालेले नाहीत.जनतेने हे सण शांतपणे साजरे केलेले आहेत. त्यामुळे मुंबईत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.