
व्हॉट्सऍपवर सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरला ‘कंपेनियन मोड’ असे नाव दिले आहे. हे एकप्रकारे मल्टी-डिव्हाइस फीचरसारखे आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन स्मार्टफोनवर एकच व्हॉट्सऍप अकाऊंट चालवणे शक्य होईल.
डब्ल्यूएबीटाइन्फोच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सऍप कंपेनियन मोड फीचरची चाचणी करत आहे. याद्वारे व्हॉट्सऍप अकाऊंटसोबत एक सेकंडरी डिव्हाइसला लिंक केले जाऊ शकते. हे फीचर सर्वात पहिल्यांदा एप्रिलमध्ये दिसले होते. आता त्याबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. वेबसाइटने एक क्रीनशॉटदेखील दाखविला आहे, ज्यामध्ये युजर्सला कंपेनियन मोडशी संबंधित एक सूचना दिली जात आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, जर तुमच्या फोनवर आधीपासूनच व्हॉट्सऍप अकाऊंट असेल आणि तुम्ही फोनला सेकंडरी डिव्हाइस म्हणून दुसऱया अकाऊंटला कनेक्ट केले असेल तर चालू अकाऊंट लॉग आऊट होईल.



























































