
राज्यात 30 मे 2022 च्या स्थितीप्रमाणे 515 गावे आणि 1180 वाड्यांना 442 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये कोकण विभागात 182 गावे आणि 572 वाड्यांना 106 टँकर्सद्वारे, नाशिक विभागात 126 गावे आणि 234 वाड्यांना 105 टँकर्सद्वारे, पुणे विभागात 75 गावे आणि 342 वाड्यांना 80 टँकर्सद्वारे, औरंगाबाद विभागात 54 गावे आणि 32 वाड्यांना 73 टँकर्सद्वारे, अमरावती विभागात 75 गावांना 75 टँकर्सद्वारे, नागपूर विभागात 3 गावांना 3 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
राज्यात मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा 26.28 टक्के
राज्यात मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात 2 जून 2022 रोजीच्या आकडेवारीप्रमाणे 26.28 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये अमरावती विभागात 32.30 टक्के, औरंगाबाद विभागात 29.58 टक्के, कोकण विभागात 38.47 टक्के, नागपूर विभागात 28.54 टक्के, नाशिक विभागात 24.09 टक्के, पुणे विभागात 20.44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


























































