
जागतिक बाजार सावरल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराने मोठी झेप घेतली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 934 अंकांची वाढ होऊन तो 52 हजार 532 अंकांवर बंद झाला तर निफ्टीतही 288 अंकांची वाढ होत तो 15 हजार 638 अंकांवर बंद झाला. आज रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि आयटी कंपन्यांनी मोठी बाजी मारली.





























































