
आजवर भल्या भल्या नेत्यांनी बंड केले; परंतु सोलापूर जिह्यातील शिवसेना कायम अभेद्य राहिली. आत्ताही संघटनेतील सर्व पदाधिकारी एकमुखाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याचसोबत आहेत. भविष्यातही येथील शिवसैनिकांची निष्ठा शिवसेनेसोबत, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसोबत व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या नेतृत्वासोबत राहण्याचा निर्धार सोलापूर जिह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दक्षिण सोलापूरचे संपर्कप्रमुख प्रकाश चव्हाण, शहर उत्तरचे संपर्कप्रमुख काशिनाथ बासुतकर व शहर मध्यचे संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, माजी जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, दत्तात्रय वानकर, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, दक्षिण तालुकाप्रमुख योगिराज पाटील, सरपंच कोमल करपे, कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी, माजी नगरसेवक बापू ढगे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले, शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते.
‘कितीही गाजावाजा झाला, तरी पक्ष सोडणाऱ्याना आजपर्यंत जनाधार मिळविता आला नाही. आजही सर्वसामान्य जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याचसोबत आहे. आगामी काळात सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,’ असे आवाहन करण्यात आले.
यावेळी दत्ता गणेशकर, विजय पुकाळे, अतुल भवर, अक्कलकोट उपतालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, तुषार आवताडे, उपशहरप्रमुख मलिक हब्बू, रविकांत कांबळे, खंडू सलगरकर, संताजी भोळे, बाळासाहेब गायकवाड, रतन खैरमोडे, रेवण बुक्कानुरे, अमित भोसले, धनराज जाधव, रेवण पुराणिक, दिनेश चव्हाण, सुरेश जगताप, धनराज जानकर, सचिन गंधुरे, सिद्धाराम खजुरगी, जयराम सुंचू, बालाजी विठ्ठलकर, सोमनाथ शिंदे, अनिल दंडगुले, मोहसीन शेख, राजू बिराजदार, रोहित तडवळकर, सुशिल कन्नुरे, संजय गवळी, संजय साळुंके, जयंत कदम, शिवा कोळी, गजेंद्र माशाळे, सचिन माने, राहुल गंधुरे, संकेत गोटे, उमेश जेटगी, राम वाकसे, रविकांत गायकवाड, शिवा ढोकळे, रवींद्र कोळी, नाना मोरे, अण्णा गवळी, आबा सावंत, सुनील यादव व काटवे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






























































