
हॉलिवूड स्टार बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ यांनी अखेर लग्नाची गाठ बांधली आहे. एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नेवाडा इथे लग्नाच्या शपथा घेतल्या.
एंटरटेनमेंट पोर्टलने एका कोर्ट रेकॉर्ड्सनुसार ही माहिती प्रसिद्ध केली आहे. बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ यांनी 16 जुलै रोजी क्लार्क काउंटी, नेवाडा मध्ये विवाह केल्याची माहिती मिळाली.
या जोडप्याच्या एका जवळच्या सूत्रानं दूजोरा दिल्याचं पोर्टलनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, लोपेझ तिच्या 14 वर्षांच्या मुलासह फर्निचर खरेदी करताना दिसली होती. ज्यावेळी तिच्या हातात एंगेजमेंट रिंग घातलेली दिसली होती.
हे जोडपं एकत्र घर शोधतानाही दिसत होतं आणि अखेर असं दिसलं की शेवटी बेव्हरली हिल्स इथे एका घरात ते स्थायिक झाले आहे.




























































