सासरच्या छळास कंटाळून महिलेची आत्महत्या, पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक त्रास देउन छळ केल्याप्रकरणी महिलेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना 22 जुलैला विमानगरमधील श्रीमा सोसायटीत घडली. याप्रकरणी पती कमलकांत लायकराम चौधरी ( वय 32 रा. श्रीमा सोसायटी, विमाननगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंजली कमलकांत चौधरी (वय 32) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

कमलकांत आणि अंजली यांचे 2014 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी कमलकांसह इतर नातेवाईकांनी अंजलीचा छळ करण्यास सुरूवात केली. अपेक्षेप्रमाणे लग्न लावून दिले नाही, लग्नात मानपान केला नाही, हुंडा जास्त मिळाला नाही, असे म्हणत अपमानित केले. तिला मारहाण करीत माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्यामुळे छळास कंटाळून 22 जुलैला अंजलीने गळफास घेउन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक मंगेश जगताप तपास करीत आहेत.