ठसा – गणेश नायडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार, अभिनेते गणेश नायडू म्हणजे गणेश भय्या हे केवळ नावाचे ‘नायडू’ होते. एखाद्या अभ्यासकाला शोभेल असा त्यांचा मराठी भाषेचा होता अभ्यास आणि उत्तम वाचनही होतं. आपण काय केलं, किती मोठं काम केलं हे सांगण्यापेक्षा रंगभूमीवरील जुने आणि अचूक संदर्भ सांगण्यावर त्यांचा भर असायचा. वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे, अशा प्रतिक्रिया विदर्भात उमटत आहेत.

नागपूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या रंगभूमीचा चालता बोलता संदर्भग्रंथ. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी मुंबई नाटय़ स्पर्धा व्हायच्या अगदी तेव्हापासूनच्या आठवणी त्यांच्याकडे होत्या. या केवळ रंजक आठवणी म्हणून ते सांगत नसत, तर त्यात अनेक संदर्भ असायचे. जुन्या रंगकर्मींनी केलेल्या वेगळ्या धाटणीच्या कामातील बारकावे सांगत असत. राज्य नाटय़ स्पर्धा सुरू झाली तेव्हा सलग तीन वर्षे आणि नंतरही नागपूरला पुरस्कार खेचून आणणाऱया दारव्हेकर मास्तरांच्या टिममधील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे गणेश नायडू होते. रंगमंचावर दुमजली नेपथ्य उभं करणं असो वा केवळ प्रकाशाच्या सहाय्याने रंगमंचावर खिडकी निर्माण करणं असो.

 नाटय़शास्त्र्ााचा प्रगाढ अभ्यास करून वैदर्भीय रंगभूमीला आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने, प्रकाशयोजनेने आणि नेपथ्याने सजविणारे अशी सुलेखनकार गणेश नायडू यांची ओळख होती. एखाद्या तरुणाला लाजवेल असे त्यांचे कार्य होते. नागपूर-विदर्भाच्या रंगभूमीवर 50 वर्षांहून अधिक काळ गाजविणाऱया गणेश नायडू यांनी आपल्या रंगकर्मी जीवनात 84 नाटकांचे नेपथ्य, 45 नाटकांची प्रकाशयोजना, 38 नाटकांमध्ये अभिनय व 18 नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. रंगभूमीवरील निष्ठsने आणि त्याच्या अनुभवामुळे हौशी रंगकर्मींसाठी ते चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांच्या प्रत्येक नाटकाला रसिकांसोबतच समीक्षकांचीही दाद मिळाली.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाद्वारे आयोजित होणाऱया हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. ते पेंद्र सरकारच्या सांस्कृतिक पेंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱया फेलोशिपचेही मानकरी होते. त्यांच्याच मार्गदर्शनात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक पेंद्राच्या वतीने कर्नाटक येथील उडुप्पी येथील थिएटर वर्कशॉप पार पडले होते. यामिनी कृष्णमूर्ती, सीतारादेवी, पं. भीमसेन जोशी, वैजयंतीमाला, हेमामालिनी, जगजित सिंग अशा दिग्गजांच्या कार्यक्रमांचे प्रकाशनियोजन व नेपथ्य सजावटही त्यांनी केली होती. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला होता आणि तो कार्यक्रम नागपूर विधान भवनात पार पडला होता. त्या सोहळ्यात गणेश नायडू यांनी केलेल्या नेपथ्य सजावटीने लता मंगेशकर गहिवरल्या होत्या आणि त्यांनी त्यासाठी नायडू यांना विशेष दाद दिली होती.

विविध कलागुण संपन्न नायडू यांनी ख्यातनाम प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि नट, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. रंजन कला मंदिर नावारूपाला आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

गणेश नायडू यांनी ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या सोबतीने हौशी रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटके दिली आहेत. राज्य शासनाच्या राज्य नाटय़ स्पर्धेत त्यांची अनेक नाटके पारितोषिकप्राप्त ठरली. विदर्भातील हौशी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने नाटय़क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. गणेश नायडू यांचे अक्षर तर मोत्यासारखे ठसठशीत होते, अनेक जण आपल्याला मिळालेले प्रमाणपत्र त्यांच्या हस्ताक्षरातले असावे अशी इच्छा बोलून दाखवायचे, त्यांनी आपल्या रेखीव अक्षरामध्ये अनेकांना नेम प्लेट बनवून दिली आहे. आजही लोकांनी ती जपून ठेवली आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीचा चालता बोलता संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांची ओळख होती, नागपुरात 2018 मध्ये झालेल्या चित्रपट महोत्सवात अभिनेते रजित कपूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. जगभरात नाटक कसे साकारले जाते हे दाखविण्यासाठी नायडू यांनी 1962 मध्ये एक शो केला होता. विविध देशांच्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांनी नाटकाच्या फिल्म्स मागवून घेतल्या होत्या. दारव्हेकर मास्तराच्या तालमीत ते तयार झाले होते, मास्तरांच्या ज्या नाटकासाठी त्यांनी नेपथ्य केले होते अशा पंचवीस नाटकांच्या नेपथ्यांचे मॉडेल त्यांनी तयार केले होते. ते नेहमी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवत होते. गणेश नायडू यांचे नागपूरच्या नाटय़ क्षेत्रात मोठे योगदान आहे. असा रंगकर्मीं पुन्हा होणे नाही.

>> महेश उपदेव