करवाचौथला 3000 कोटींच्या दागिन्यांची खरेदी, 800 कोटींनी विक्री वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात करवाचौथ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशीही सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. यंदा करवाचौथच्या दिवशी सोन्याच्या दागिन्यांची तब्बल 3000 कोटींची विक्री झाली आहे. तर मागच्या वर्षी 2200 कोटींची विक्री झाली होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांची विक्री 800 कोटींनी यंदा वाढली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) तसेच देशातील लहान ज्वेलरी संघटना ऑल इंडिया ज्वेलर्स आणि गोल्डस्मिथ फेडरेशने संयुक्तरित्या दिलेल्या माहितीनुसार, दागिन्यांच्या व्यापाऱ्यांना करवा चौथच्या दिवशी व्यापाराची चांगली संधी मिळाली. हिंदुस्थानी परंपरेनुसार येत्या नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱ्या लग्नसराईसाठी सोन्याच्या दागिन्यांची बुकिंग करण्यात आली आहे.

कॅटचे महासचिव प्रवीण खंडेलवाल तसेच आयजेजीएफचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोडा यांनी सांगितले की, देशात सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. गतवर्षी करवाचौथला 10 ग्रॅमचे सोने 3400 रुपये तर चांदी 11 हजार रुपये किलो होती. 24 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार रुपये 10 ग्रॅम सोन्याचा भाव. चांदी 59 हजार रुपये प्रतिकिलो आहे. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर उतार चढाव पाहता सोन्याच्या भावांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.