राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हकालपट्टीसाठी पंढरपूर बंदची हाक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pandharpur-band

महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा अशी मागणी करत आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. पंढरपूरकरांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र सकाळपासूनच मिळत आहे.

आज सोमवार, 19 डिसेंबर रोजी भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी पंढरपूर बंदची हाक दिली होती. या बंदला व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त दिल्याचे दिसत आहे.