ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज गोरेगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी सकाळी 11 वाजता येथून निघणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
कमलाकर नाडकर्णी यांचा परखड आणि अभ्यासू समीक्षक म्हणून मराठी नाटय़सृष्टीत दबदबा होता. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सोबत महानगर अशा अनेक दैनिक, नियतकालिकांमध्ये त्यांनी नाटय़समीक्षण केले. त्यांची ‘ठेवणीतील नाटकं’ आणि ‘नाटकी नाटक’ ही दोन पुस्तके विशेष गाजली. नाटय़परिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवले होते. त्यांच्या निधनाबद्दल नाटय़सृष्टीत तीक्र शोक व्यक्त होत आहे.