अखेर पश्चिम रेल्वेने गोखले पुलाचा ताबा पालिकेला दिला, आता पालिका पुनर्बांधणी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी आणि विलेपार्ले स्थानकादरम्यान असलेल्या गोखले पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्केने पूर्ण केले असून येथील रेल्केची सर्क यंत्रसामग्री हालकण्यात आली आहे. तसेच सदर पुलाच्या रिकाम्या जागेचा ताबा शुक्रकारी रेल्केने पालिकेला दिली आहे. त्यामुळे पालिकेला आता नक्या पुलाची उभारणी करता येणार आहे.

गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला होता. 2019 मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्कच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले; मात्र, रेल्के हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्के हद्दीतील उड्डाणपूल पाडून नका बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार 7 नोक्हेंबर 2022 रोजी अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल काहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच रेल्केच्या हद्दीतील पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्केकडे सोपकिण्यात आले होते. त्यानुसार रेल्केने ट्रफिक ब्लॉक घेत पाडकाम 16 मार्च रोजी पूर्ण केले होते. त्यानंतर आता रिकामी जागा पालिकेकडे सुपूर्द केली आहे.