
दिल्ली मेट्रोतील विचित्र घटनांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आधी बिकीनी घालून मेट्रो गर्ल, नंतर मेट्रोत आंघोळ करणारा तरुण, अश्लील नृत्य करणारी तरुणी, नंतर हस्तमैथुन करणारा तरुण..अशा धक्कादायक घटना होत असताना आता दिल्ली मेट्रोतील आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यामध्ये एक युगुल मेट्रोत बसून एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये एक प्रेमीयुगुल दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने खाली बसले होते. त्यावेळी तरुणाने तरुणीला आपल्या मांडीवर घेतले होते आणि त्यावेळी ती तरुणी नशेत किंवा झोपेत असल्याचे दिसत आहे. त्याने तिला मांडीवर घेतल्यानंतर त्याने अनेकदा तिचे चुंबन घेतले. दरम्यान त्यावेळी त्या युगुलासमोर बसलेल्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मेट्रोमध्ये घडलेल्या या घटनेमुळे डीएमआरसी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रेमीयुगुलचा लिप लॉक करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ऑडिओमध्ये ऐकू येतेय की, ट्रेन झंडेवालान मेट्रो स्टेशनच्या दिशेने जात आहे, म्हणजेच ही ब्लू लाइन मेट्रोच्या आतील बाब आहे. एका युजरने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत लिहीले की, दिल्ली मेट्रो . एका युजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर, दिल्ली मेट्रोमध्ये सांगतात सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. मग कंट्रोल रूमवाले काय करत होते. हे अजिबात बरोबर नाही आहे. आता तर कुटुंबासोबत मेट्रोमध्ये फिरायला जाणे मुश्किल झाले आहे, यासारख्या लोकांना लाज शरम नाहीय.
























































