समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोगवे-नेवाळी (ता. वेंगुर्ले) येथे आंघोळीसाठी शुक्रवारी सायंकाळी समुद्रात उतरलेल्या मुंबई – भांडुपस्थित उमेश हरिश्चंद्र राणे (52) यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. अचानक झालेल्या या अपघाती घटनेने राणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे-नेवाळी येथे मुंबईवरून मित्रांकडे गावी देवळातील कार्यक्रमासाठी राणे आपल्या आई व मुलासह आले होते. शुक्रवारी सायंकाळी समुद्रातील पाण्यात ते आंघोळीसाठी उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यावेळी सोबत असलेल्या अन्य सहकाऱयांनी आरडाओरडा करत स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले व उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले.