विज्ञान- रंजन — ‘छोटय़ा’ न्यूटनची ‘मोठी’ गोष्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

‘न्यूटन’ हे नाव उच्चारताच काय आठवतं, तर त्याची ती सफरचंदाची गोष्ट आणि त्याने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध. आमच्या शालेय पुस्तकात न्यूटनचं तसंच चित्र असायचं. एका विज्ञान संस्थेच्या उद्यानातही न्यूटनचा तसाच पुतळा आहे. इतपं हे न्यूटन आणि सफरचंदाचं अद्वैत आपल्या मनात रुजलंय.

पण ही त्याच्या संशोधनाचा केवळ एक भाग ठरणारी घटना. त्याविषयी आपण पुढच्या लेखात माहिती घेणार आहोत, पण सर पदवी प्राप्त झालेल्या न्यूटनची कामगिरी याहून कितीतरी मोठी आणि विविध विज्ञान क्षेत्रांतली आहे.

आयझॅक न्यूटनचा जन्म इंग्लंडमधल्या लिंकनशर भागात 25 डिसेंबर 1642 किंवा 4 जानेवारी 1643 रोजी झाला आणि 84 वर्षांचं प्रदीर्घ संशोधनसंपन्न जीवन व्यतीत करून सर न्यूटन 20 मार्च 1726 किंवा 31 मार्च 1727 या दिवशी हे जग सोडून गेला. आता हा न्यूटनच्या जन्मतारखेचा घोळ पोप ग्रेगरी यांनी सुधारित कॅलेंडर स्वीकारलं तेव्हा काही काळ झाला. न्यूटनच्या जन्माच्या वेळी त्यापूर्वीचं ज्युलियन कॅलेंडर इंग्लंडमध्ये सर्वमान्य होतं. त्यामुळे ज्युलियन कॅलेंडरनुसार 25 डिसेंबर 1642 ही न्यूटनची जन्म तारीख. त्याच्या निधनानंतर 25 किंवा 26 वर्षांनी इंग्लंडने ‘ग्रेगरियन कॅलेंडर’ स्वीकारलं. त्यामुळे जुन्या-नव्या पाश्चात्त्य दिनदर्शिकेत न्यूटनच्या जन्म-मृत्यूची दुहेरी नोंद आढळते. या बदलाचे गणित आपण इंग्रजी नववर्षाच्या आरंभी जाणून घेऊ.

न्यूटनला या जगात येण्याची घाई झाली होती एवढं मात्र खरं. कारण त्याचा जन्म सहाव्या महिन्यातच झाला. तेव्हा तो इतका चिमुकला होता की, त्याची आईच त्याला हा ‘क्वॉर्टर मगमध्ये मावेल असा होता’ असं म्हणायची. असा ‘प्रीमॅच्युअर बर्थ’असलेला न्यूटन पुढे चांगला सशक्त झाला, बुद्धिमान झाला आणि त्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर जगापुढे यशस्वी गणिती प्रमेयं मांडली. खगोलशास्त्र्ााचा अभ्यास केला. पॅल्क्युलस या गणिती प्रकाराचा अभ्यास करून ‘प्रिन्सिपिआ मॅथॅमॅटिका’ किंवा ‘मॅथॅमॅटिक प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी’ हा ग्रंथ 1687 मध्ये लिहिला. आजही तो इंग्लंडमध्ये केंब्रिज येथे जतन करून ठेवण्यात आला आहे.

न्यूटनने गतीचे नियम (लॉज ऑफ मोशन) सोप्या शब्दांत मांडले. एखाद्या वस्तूवर बाहय़ बल परिणाम करत नसेल तर ती स्थिर किंवा सरळ रेषेत समान गतीमध्ये असल्यास तशीच राहील अशा साध्या वाटणाऱया, पण तोपर्यंत ज्ञात नसलेल्या भौतिकशास्त्र्ााrय नियमाची मांडणी न्यूटनने केली. विज्ञानातील संशोधन दोन प्रकारचे असते. ‘गुरू’ ग्रहाचे ‘चंद्र’ किती, असा प्रश्न आता विचारला तर ‘शंभरहून जास्त’ असं उत्तर येईल, पण तीस-चाळीस वर्षांपूर्वी आम्हाला गुरूचे सत्तर-ऐंशी ‘चंद्र’च ठाऊक होते. अशा प्रकारे गुरूच्या चंद्रात झालेली ‘वाढ’ म्हणजे आपल्या निरीक्षणात झालेली प्रगती. त्यापूर्वीही गुरूला अनेक ‘चंद्र’ होतेच. त्यांचा शोध आपल्याला लागायचा होता. त्यामुळे असे शोध ही ‘डिस्कव्हरी’ मानली जाते. मात्र एखाद्या गोष्टीमागचा वैज्ञानिक कार्यकारणभाव जाणून ‘नियम’ मांडणे हे संशोधन समजण्यात येते. न्यूटनने विचार करण्यापूर्वीही सफरचंदं झाडावरून खालीच पडत होती, परंतु एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षित होते आणि कोणत्याही वस्तुमानात गुरुत्वाकर्षण असते हे त्यामागचं सूत्र शोधून काढण्याला संशोधन म्हटलं गेलं.

न्यूटनचं बालपण त्याच्या आजीकडे (आईची आई) गेलं. आई आणि सावत्र वडिलांपेक्षा त्याला आजीची माया अधिक लाभली. बालपणी ‘हा बहुधा शेती करणार’ असं म्हटलं जायचं, पण न्यूटनचा कल भौतिकशास्त्र्ााकडे जास्त होता. 1664 मध्ये पेंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजात न्यूटनला शिष्यवृत्ती मिळाली. तिथेच तरुण न्यूटनने तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलपासून शास्त्र्ाज्ञ गॅलिलिओपर्यंत सर्वांची पुस्तपं वाचली आणि त्यावर सखोल विचार केला. कालांतराने इंग्लंडमध्ये प्लेगची साथ फैलावली न्यूटनचं कॉलेज बंद झालं आणि वुल्सथॉर्प इथल्या घरी तो चिंतनात वेळ घालवू लागला. त्याच सुमारास केव्हा तरी ‘पडतं’ सफरचंद पाहून त्याला गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली असावी असं म्हटलं जातं. तिथेच त्याने कॅल्क्युलसचाही अभ्यास केला.

1667 मध्ये न्यूटनला ट्रिनिटी कॉलेजकडून ‘फेलोशिप’ मिळाली, पण त्याचे विज्ञानवादी विचार रूढीवाद्यांना पटण्यासारखे नव्हते. तरीही इंग्लंडचा तत्कालीन राजा दुसरा चार्ल्स (आताचा तिसरा चार्ल्स) याने विशेष परवानगी दिल्याने न्यूटनच्या संशोधनात अडसर आला नाही. पुढे 1672 मध्ये न्यूटनला ‘रॉयल सोसायटी’चीही फेलोशिप प्राप्त झाली. न्यूटनच्या पॅल्क्युलसच्या संशोधनाच्या वेळीच लिबनिझ या शास्त्र्ाज्ञाने याच विषयावर केलेल्या संशोधनामुळे वादही झाला. शिवाय न्यूटनने त्याच्या संशोधनाच्या नोंदणीतही दिरंगाई केली होती. असं सगळं असलं तरी गणित, भौतिकशास्त्र्ा, खगोलशास्त्र्ा, कॅल्क्युलस, गुरुत्वाकर्षण, ऑप्टिक्स यातलं न्यूटनचं संशोधन मूलगामी होतं. गॅलिलिओच्या भिंगाच्या दुर्बिणीला पर्याय देणारी सुटसुटीत आकाराची परावर्ती आरशाची दुर्बीण म्हणजे खगोल अभ्यासकांना न्यूटनने दिलेली देणगीच आहे. लोलकातून (प्रिझम) दिसणाऱया प्रकाशाच्या सप्तरंगी पृथःकरणाचं इंगित त्यानेच सांगितले. प्रसिद्ध धूमकेतू शोधणाऱया ‘हॅली’ यांच्याशीही न्यूटनचा संपर्क होता. प्रदीर्घ जीवनात प्रचंड संशोधन करणाऱया न्यूटनला ‘नाइटहूड’ पिंवा ‘सर’ ही मानाची पदवी मिळाली.