लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी, मुंबई पोलिसांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला असून धमकी देणाऱ्याने आपण विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तिने धमकीचा फोन केला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत. मी विलेपार्ले परिसरातून बोलत आहे, असं त्या अज्ञात व्यक्तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर अज्ञाताने फोन ठेवून दिला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.