
मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप क्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण जिह्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिकीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा क्हिडिओ सोशल मीडियाकर क्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.
अश्लील शिकीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप क्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीकाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील क त्यांचे सहकारी असतील असं सुद्धा म्हटलं होतं. दरम्यान, गुरूकारी सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा क्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच क्हायरल झाला आहे.
या घटनेचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाने तीक्र शब्दांत निषेध करीत धमकी देणारे आमदार आणि मारहाण करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



























































