
नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामुहिक अथर्वशिर्ष पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विणा दिघे, अमृता बेडेकर, शारदा होशिंग, राधिका परदेशी, लक्ष्मी गायकवाड, प्राची पाठक, अनुराधा सुरसे, विद्या मलिकपेटकर, शितल राऊत, स्वप्ना बेडेकर, मधु भंडारी, निनाद ढोरे आदिंनी अथर्वशिर्ष पठणास प्रारंभ केला. यावेळी रेखा झंवर, आशा पुंड आदिंसह महिलांनी शंखनाद केला.
या अथर्वशिर्ष पठणातअसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वेशभुषा, एक ताल-सुरात अथर्वशिर्षने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी बाल कलाकार मुलांशु परदेशी व आरोहि बेडेकर यांनी श्री गणेशाची भक्तीगीते सादर केली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात महिलांचा सन्मान केला. त्यानंतर महाआरती करुन प्रसाद वाटपाने सांगता झाली. या अथर्वशीर्षासाठी गणेश आंबेकर, नितीन पुंड, प्रणित अनमल, राजेश एकाडे, राजु जग्गी, गणेश पालवे, सतीश पठारे, सुधीर सुळ, सुहास दुर्गे, संदिप बेरड, प्रदीप झोडगे, शांती ऑडिओचे राजू ढोरे, नियोजन ऋषीकेश आगरकर, गणेश राऊत आदिंनी केले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, संजय चाफे, नितिन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते.






























































