त्यांना बॉलिवूडच्या लोकांसोबत नाचायचं होतं म्हणून… आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे कारण दिले जात आहे. पण अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नाही त्यांना शेतकऱ्यांची काहीही पडलेली नाही. त्यांना बॉलिवूडच्या लोकांसोबत नाचायचं होतं, त्यांच्या नातेवाईकांना सेलिब्रिटींसोबत फोटो काढायचे होते”, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या दौऱ्यांची पोलखोल केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जर्मनी -लंडन दौऱ्यांवर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घाना दौऱ्यांबाबत काही प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच दोन्ही दौरे रद्द करण्यात आले होते. राज्य सरकारचे हे रद्द झालेले दौरे व त्या आधी केलेल्या दौऱ्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारची पोल खोल केली आहे.

”या सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत ज्यांना फॉरेन ट्रीप करायाल आवडत. पण हे जनतेच्या पैशांवर ट्रीप करायला लागले आहे. ट्रीप मी मुद्दाम बोलतोय कारण हे दौऱ्यांना आता सुट्टी समजायला लागले आहेत. या दौऱ्यांमधून नक्की काय फायदा होतोय हे यांना विचारायला हवं. मुख्यमंत्र्यांचा जर्मनी आणि लंडन दौऱा होता. जर्मनीला जाऊन त्यांना हायवे बघायचे होते. त्यांच्याकडे इतकी वर्ष एमएमआरडीएचं खातं आहे. मग आता तिथे जाऊन काय हायवे बघायचे. त्यानंतर लंडनला काय. करणार त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. मी त्यांना तिथे काय करणार त्याचा प्रश्न केला होता. मी गेलेलो तेव्हा त्याचे वेळापत्रक जनतेसमोर आणत होतो. दावोसमध्ये झालेल्या करारांबाबत सांगत होतो. कोणाला किती वाजता भेटलो ते आपल्यासमोर आहे. पण यांना मी लंडन जर्मीनीचा दौऱ्यांवर जाऊन करणार तरी काय हा सवाल केला. त्यानंतर तीस मिनिटात हा दौरा पोस्टपोन केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष महोदयांचा एक दौरा निघत होता. ते घानाला जाणार होते. आम्ही सर्वांनी एकच प्रश्न केला. हा जोक नाही का? इथे जी लोकशाहीची हत्या करतायत ते तिथे लोकशाहीवर जाऊन बोलणार होते. म्हणजे पेशंट इथे टेबलवर आहे आणि तुम्ही तिथे ऑपरेशन करायला चालले आहात. मूळ मुद्दा हाच आहे की स्वत:च्या देशात तुम्ही लोकशाही मारत आहात. तिथे जाऊन लोकांसमोर देशाची बदनामी करू नका. ते म्हणतील महाराष्ट्रात लोकशाही मारली आणि इथे येऊन लोकशाहीवर बोलतायत. म्हणून मी त्यांना विनंती केली होती की तिथे जाऊ नका. त्यानंतर त्यांनी दौरा रद्द केला. परिणाम हा झाला की बरोबर दोन दौरे हे रद्द करण्यात आले”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

”आगामी तिसरा दौरा हा खूप हास्यास्पद आहे. उद्योगमंत्र्याचा हा दौरा आहे. तीन ऑक्टोबरला ते फ्लाईटने युकेला जाणार. सकाळी तिथे ताजमहलला राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. त्यात कोणत्या कंपनीला भेटणार आहात. याची काहीही माहिती नाही. तिथे कुणाला भेटणार हेच माहित नसेल तर परत ही सुट्टीच समजायची का आम्ही. तिथून ते विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये सामंजस्य करारासाठी जाणार आहेत. त्यानंतर चार तारखेला उद्योगमंत्री आर्टिफिशयल इंटिलिजन्सच्या कॉन्फरन्समध्ये जाणार आहेत. त्यानंतर पाच तारखेला दावोस येथे होणाऱ्या आर्थिक परिषदेची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. ही पाहणी म्हणजे नक्की काय? दावोस आमच्या कलानगर एवढी एक गल्ली आहे. मग नक्की कुठली पाहणी आहे. असे कोणत्याच राज्याचे काय देशाचे मंत्री दावोच्या परिषदेआधी तिथला दौरा करत नाहीत. मग हा दौरा कशासाठी? त्यामुळे हा दौरा रद्द झालाच पाहिजे. तिथे उगाच कशाला जनतेचा पैसा अशा प्रकारे उडवायचा. स्विझरलँडला जायचंय तिथल्या बर्फात खेळायचंय तर स्वखर्चाने जा. जनतेच्या पैशाने असे बिनकामी दौरे कशाला’, अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्या दौऱ्याची पोलखोल केली आहे.

काल एक महत्त्वाचा जीआर निघाला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या जपानच्या दौऱ्याचा हा जीआर आहे. जपानमधील वाकायमचा हा दौरा होता. या सरकारच्या जीआरमध्ये स्पष्ट पणे लिहले आहे की काऊन्सिल जनरल ऑफ जपानने उपमुख्यमंत्र्यांनी टोकयोच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आमंत्रित केलं होतं. याचा आपण साधारण काय अर्थ लावतो की जर त्यांनी आमंत्रित केलं आहे तर त्याचा संपूर्ण खर्च जपान करणार. पण या जीआरमध्ये लिहलं आहे की त्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च एमआयडीसीने उचलला आहे. मग एमआयडीसीचे मंत्री का नव्हते या दौऱ्याला. जपानवरून ते 25 ऑगस्टवरून परतले पण एक महिना उलटला तरी या दौऱ्यात काय झालं त्याचा कोणताही अहवाल समोर का आलेला नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे