एशियन गेम्समध्ये दिवसभरात 9 पदकांची लयलूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हांगझू एशियन गेम्स 2023मध्ये सोमवारी हिंदुस्थानच्या खात्यात अजून नऊ पदकांची भर पडली आहे. हिंदुस्थानची पारुल चौधरी आणि प्रीती यांनी महिलांच्या अडथळा शर्यतीत रौप्य आणि कांस्य पदक पटकावली आहेत. त्या दोघींनीही आपला वैयक्तिक सर्वोत्तम खेळ दाखवत ही पदकांची कमाई केली. यापूर्वी हिंदुस्थानच्या महिला रिले संघाने कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर काही वेळाने पुरुषांच्या रिले संघानेही कांस्य पदक पटकावलं.

सोमवारी दिवसभरात हिंदुस्थानच्या खात्यात 9 पदांची भर पडली आहे. याची सुरुवात तिरंदाजीने झाली. तेजस्विन शंकरने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ केला. तर कृष्णकुमार आणि मोहम्मद अफसल यांनीही 800 मीटरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.