आष्टी तालुक्यात पारधी महिलेला विवस्त्र करुन मारहाण! सोशल माध्यमात व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तलावासाठी संपादित केलेली जमीन रिकामी का करत नाहीत म्हणून दोघाजनाने पारधी कुटुंबाला मारहान करत, कुटुंबातील महिलेला विवस्त्र केल्याचा गंभीर आरोप पारधी महिलेने केला या बाबत पोलिसात तक्रार ही देण्यात आली ही गंभीर घटना आष्टी तालुक्यातील वाळूज येथे घडली,

येथील पारधी महिला यांची शेत जमीन सर्व्हे नं 66 नवीन गट क्रमांक 77 मध्ये 1971-72पासून जमीन तलाव जलिंसचन प्रकल्पासाठी शासनाने संपादित केलेली आहे. यामध्ये गाळपेर्‍याच्या शिल्लक जमिनीवर सदरील कुटूंब शेती करुन आपली उपजिवीका भागवत आहे.ही जमीन खाली कर म्हणत दोन आरोपींनी दि 15ऑक्टोबर रोजी पिडीत महिलेला व तिच्या पतीला बेदम मारहाण केली या घटनेत पिडीत महिलेला विवस्त्र करण्यात आल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाळूज येथे घडली.

एका आदिवासी महिलेला विवस्त्र करत मारहाण केल्याची घटना घडल्याने व या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यामात व्हायरल झाल्याने जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात आहे.याप्रकरणाने पिडित महिला व कुटूंब भयभीत झाले असून या प्रकरणी पिडीत महिलेने आरोपींवर कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधीकारी यांना दिले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. सदरील प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऑनलाईन तक्रार दाखल झाली असून पिडीत कुटूंब अद्यापही आष्टी पोलीसात जवाब नोंदविण्यासाठी हजर न झाल्याने पुढील कारवाई होऊ शकली नाही. याप्रकरणाची चौकशी सुरु असून पिडीतेला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करुन असे आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगीतले आहे