गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीएस पदाच्या निवडणूकीत युवासेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोगटे जोगळेकर महाविदयालयात नुकत्याच झालेल्या जीएस पदाच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेचा सक्रिय सदस्य कुणाल कवटेकर याने दणदणीत विजय मिळवला. हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व सहकार्‍यांचा व युवासैनिकांचा आहे, अशी प्रतिक्रिया कुणालने विजयानंतर व्यक्त केली. महाराष्ट्र कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, तालुका प्रमुख प्रसाद सावंत ह्यांचा मार्गदर्शनाखाली कॉलेज कक्ष तालुका प्रमुख पारस साखरे गोगटे कॉलेज युनिटचे अध्यक्ष अमन राणे मेहनत घेतली. कुणाल याला 17, कौशल मोहिते याला 15 तर आर्या जोगळेकरला 5 मतं मिळाली. गोगटे कॉलेजचे माजी अध्यक्ष स्वराज साळुंखे, युनिटचे उपाध्यक्ष चिन्मय पोइपकर, सचिव साहिल कांबळे, सहसचिव निहाल सुर्वे, पवन भारती, सर्वेश पाटील आणि सर्व सदस्य तसेच कॉलेज युनिटच्या उपतालुका प्रमुख नुपुर आचरेकर या सर्वांच्या प्रयत्नांमुळे गोगटे कॉलेजवर भगवा फडकवणे शक्य झाले.