
2023मध्ये इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची पाच गाणी सर्वाधिक व्हायरल झाली. ‘हस हस’मधील दिलजीत दोसांझ आणि सियाची डायनॅमिक जोडी असलेले ‘हस हस’ गाणे लोकांना आवडले. यूटय़ूबवर या व्हिडीओचे 4.8 कोटी व्ह्यूज आहेत.
अपारशक्ती खुरानाच्या ‘कुडिये नी’ने इन्स्टाग्रामवर सगळय़ांना वेड लावले. गाण्याला यूटय़ूबवर 270 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.’जवान’मधील ‘चलेया’ या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यूटय़ूबवर त्याला 24.9 कोटी व्ह्यूज आहेत.विकी कौशलचे ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातील ‘तेरे वास्ते’ गाणे इन्स्टाग्रामवर जास्त चर्चेत राहिले. यूटय़ूबवर 31.3 कोटी व्ह्यूज आहेत.रणवीर सिंगच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘व्हॉट झुमका’ या गाण्याला इन्स्टाग्रामवर 22.2 कोटी व्ह्यूज आहेत. या गाण्यावर असंख्य रील्स व्हायरल झाल्या आहेत.




























































