जपान हादरले! 7.5 रिश्टल स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा, लोकांना घरं खाली करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून लोकांना घरं खाली करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.