
रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (RFDL) 2024 ने प्रादेशिक पात्रता समारोपाने एक महत्त्वाचा क्षण गाठला आहे. ज्यामुळे तीव्र राष्ट्रीय ग्रुप स्टेजचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई, कोझिकोड, दिल्ली आणि गोवा या चार केंद्रांवर आठ झोनमधील 20 संघांसह 12 ते 26 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. हा मंच प्रतिभा आणि कौशल्याच्या रोमांचकारी प्रदर्शनासाठी तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गटात पाच संघ निवडले गेले आहेत आणि 40 सामने खेळवले जाणार आहेत. यातून अव्वल चार संघ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवतील. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण इथे पाहता येईल. https://www.youtube.com/@RelianceFoundationYouthSports
मोहन बागान सुपर जायंटचे मुख्य प्रशिक्षक अँटोनियो हबास यांच्यासह इंडियन सुपर लीग मधील अनेक प्रशिक्षकांनी भारतीय फुटबॉलचे भविष्य घडवण्यात RFDL ने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला आहे. RFDL सारख्या युवा विकास उपक्रमांमध्ये गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करून हबास यांनी स्काऊटिंग नेटवर्कवर लीगच्या प्रभावावर प्रकाश टाकला. “रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (RFDL) खूप महत्त्वाची आहे, कारण आम्हाला आमच्या मुख्य संघासाठी अकादमी आणि तरुण खेळाडूंची गरज आहे. खेळाचा पाया माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याने आम्हाला या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे खेळाडू तांत्रिकदृष्ट्या चांगले बनतात. खेळाडूंना खेळासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. तरुणांना थेट मुख्य संघात आणणे चांगले नाही, म्हणून त्यांना RFDL सारख्या स्पर्धांची गरज आहे. आमच्याकडे असे लोक आहेत जे प्रत्येक RFDL सामन्यावर लक्ष ठेवतात, कारण या स्पर्धेत भारतीय फुटबॉलचे भविष्यातील स्टार खेळत आहेत,” अँटोनियो हबास म्हणाले.
राष्ट्रीय ग्रुप स्टेजसाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये आयएसएल क्लब बंगळुरू एफसी, ईस्ट बंगाल एफसी, पंजाब एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यासह रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स (RFYC) संघाचा समावेश आहे. त्यामुळे या लीगच्या माध्यमातून युवा खेळाडूंना देशभरातील काही सर्वोत्तम क्लबविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे.पात्र ठरलेल्या प्रत्येक संघातून प्रेरणादायी कथा मिळत आहेत. या प्रेरणादायी संघांत दिल्ली एफसी आणि डेम्पो एससी व्यतिरिक्त मुथूट एफए, पॅक्स ऑफ नागोवा, अदामास युनायटेड एसए, रूट्स एफसी, पर्रापूर एफसी, होम मिशन एफसी आणि मायटी यंग जो जीएमएससी या संघांचा समावेश आहे. ज्यांनी त्यांच्या समकक्षांना मागे टाकले आहे, ज्यामध्ये काही ISL क्लबचा समावेश आहे. जे RFDL द्वारे ऑफर केलेली अफाट स्पर्धात्मकता, सर्वसमावेशकता आणि संधी प्रदर्शित करतात.


























































