विद्यार्थीपुरवत होते ठगांना सिमकार्ड, बँक खाती ; फसवणुकीचे चायनीज कनेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोनच्या वसुलीसाठी महिलेचे मॉर्फ पह्टो व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी दोघांना बांगूर नगर पोलिसांनी दिल्लीतून बेडय़ा ठोकल्या. मुदित दीपक जैन आणि लवलीत नरेशकुमार ऊर्फ निखिल अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे विद्यार्थी असून सायबर ठगांना सिमकार्ड आणि बँक खाती पुरवत असायचे.

तक्रारदार या महिला असून त्या गोरेगाव परिसरात राहतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने लोन अॅपच्या माध्यमातून 37 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र प्रोसेस फी आणि इतर कर असे वगळून त्याच्या खात्यात फक्त 21 हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर कर्ज वसुलीसाठी ठगाने महिलेकडे तगादा लावला. ठगाने महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील पह्टो तिच्या नातेवाईकांना पाठवले. जर लोनची रक्कम न भरल्यास ते आणखी काहींना पह्टो पाठवू, अशी धमकी दिली. मॉर्फ पह्टो व्हायरल केल्या प्रकरणी महिलेने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ-11चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विवेक तांबे, भदरगे, पेंद्रे, गोवळेकर, नईम शेख आदीच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस दिल्लीला गेले. दिल्लीच्या रोहिणी येथून पोलिसांनी मुदितला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत लवलीतचे नाव समोर आले. त्याला दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली. मुदित आणि लवलीत हे दोघे विद्यार्थी आहेत. त्या दोघांना अटक करून मुंबईत आणले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

टेलिग्रामवरून पुरवायचे बँक खाती

लोनच्या नावाखाली फसवणूक करणारी हे चायनीज रॅकेट आहे. टेलिग्राम अॅप्सवरून कोणाला कॉर्पोरेट आणि बचत खाती हवी का, अशी विचारणा केली जाते. त्यानंतर बँक खात्याच्या नावाखाली ते प्रलोभन देऊन खाती घेतात. ती खाती ठगांना वापरण्यास देतात. त्या खात्यात फसवणुकीचे पैसे जमा होत असतात.