
मणिपूर पुन्हा पेटले असून मंगळवारी विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर मणिपूरमध्ये पाच दिवस संचारबंदी आणि इंटरनेटबंदी करण्यात आली. दीड वर्षापासून मणिपूर धगधगत असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. हे सर्व जर गुजरातेत घडले असते तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटले असते. तसेच उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्र या देशातील प्रमुख राज्यांमध्ये असे हिंसक संकट आले असते तरी पेंद्राने ते चालू दिले असते का, असा सवाल करत काँग्रेसने एनडीएला अक्षरशः आरसा दाखवला आहे.
मणिपूर इनर सीटचे काँग्रेस खासदार डॉ. ए. बिमोल अकोईजाम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे अकोईजाम यांनी मणिपूरमधील सध्याची परिस्थिती 1947 मधील हिंदुस्थानच्या फाळणीची आठवण करून देणारी आहे. 2021 पासून 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका म्हणून साजरा करण्याच्या सरकारच्या अलीकडच्या प्रयत्नांमुळे हे विशेषतः वेदनादायक असल्याचे अकोईजाम यांनी म्हटले आहे. मणिपूरमधील लोकांच्या जीवनात काय सुरू आहे त्याचा पेंद्राला काहीही फरक पडत नाही अशी टीका अकोईजाम यांनी केली आहे.

























































