मानवरहित जहाज समुद्रात शत्रूला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सागरी सामर्थ्य वाढवण्याचे ध्येय ठेवत संरक्षण मंत्रालयाने पाण्यावर चालणारे 100 टनाचे मानवरहित जहाज बनवायला नौदलाला परवानगी दिली आहे. मानवरहित जहाज शत्रूच्या पाणबुडय़ा आणि जहाजांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम असेल. स्पह्टके पेरणे आणि शोधणे त्याचबरोबर शत्रूवर पाळत ठेवणे अशी कामे हे जहाज करेल. मानवरहित जहाज ताफ्यात आल्यानंतर नौदलाची पाण्यातील ताकद वाढणार आहे. नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल एस. एन. घोरमडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात अनेक कामे करण्यासाठी मानवरहित जहाजाची मदत होईल. खास करून स्पह्टके पेरणे आणि लावणे, व शस्त्रास्त्र लाँच करणे अशा कामांसाठी जहाज उपयुक्त असेल, असे मानवरहित जहाजांसाठी लवकरच नौदलातर्फे टेंडर काढले जाईल. जे दीर्घकाळ पाण्यावर राहील आणि किनाऱयापासून दूर राहून संशयित जहाजांवर लक्ष ठेवू शकेल.