
दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीय संकल्प असून टार्गेट, टाइम आणि हल्ला कशाप्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत मांडली. त्यानंतर आजही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक झाली. त्याचबरोबर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान लवकरच पाकिस्तानवर मोठा हल्ला करू शकतो, अशी भीती पाकडय़ांना सतावत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनीच एक्सवर पहाटे 3 वाजता व्हिडीओ अपलोड करून हल्ल्याबाबतची भीती व्यक्त केली आहे.