
उत्तर प्रदेशातील अमेठी येथे बारावी नापास डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. अभिनय प्रताप सिंह असे या डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या विरोधात तक्रार झाली आहे. औषधाचे नावही वाचता न येणाऱया या डॉक्टरने आठ वर्षांत अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. अमेठी येथील बहोरापूर गावात अभिनय सिंहचा दवाखाना असून तो आयुर्वेद आणि इतर नैसर्गिक औषधांनी रुग्णांवर उपचार करत असे, पण त्याच्याकडे कोणतीही पदवी नाही. डॉक्टराकडून उपचार घेण्यासाठी एक महिना आधीच नंबर बुक करावा लागायचा. कारण दररोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येतात.