राज्यात डुप्लिकेट दारूचा महापूर, बनावट दारू विक्री गुह्यांमध्ये 37 टक्के वाढ; उत्पादन शुल्क विभागाच्या कृती कार्यक्रमातील माहिती

महाराष्ट्रात एकीकडे गुह्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे बनावट मद्य विक्री आणि वाहतुकीच्या गुह्यांमध्येही वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अहवालानुसार माहितीनुसार बनावट मद्य विक्रीच्या गुह्यांमध्ये तब्बल 37.49 टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या व्यवसायात गुंतलेले 730 सराईत गुन्हेगार सापडले आहेत.

राज्य सरकारच्या महसुलाचा कणा समजल्या जाणाऱया अबकारी शुल्क विभागाने 100 दिवसांमध्ये कोणती कामे केली त्याचा सद्यस्थितीचा अहवाल सादर केला आहे. या कृती आराखडय़ामध्ये राज्यातील अवैध मद्य धंद्यावरील कारवाईत वाढ करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ही कारवाई करण्यास या विभागाला यश आले आहे. अवैध मद्य विक्री करणाऱयांच्या विरोधात 1 जानेवारी ते 15 एप्रिल या काळात राबवलेल्या कारवाईत तब्बल 21 हजार 118 गुन्हे दाखल करण्यात आले. तर मागील वर्षीच्या तुलनेत अवैध मद्य विक्रीच्या गुह्यात 37.49 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत तब्बल 56 कोटी 48 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.

100 दिवसांत 100 अड्डे बंद

हातभट्टी गावठी दारू निर्मिती आणि विक्री हा व्यवसाय पूर्णपणे बेकायदा असून यामुळे नागरिकांच्या जिवाला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने 100 दिवसांत हातभट्टीचे 100 अड्डे बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार या कालावधीत 112 हातभट्टय़ा आणि 181 दारूचे गुत्ते बंद करण्यात आले. विना परवाना मद्य व्यवसाय करणे गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 4

चांगल्या वर्तणुकीची हमी घेतली

या शंभर दिवसांच्या कालावधीत अवैध मद्यविक्री व्यवसाय करणाऱयांच्या विरोधात मोहीम राबवली होती. त्यात 730 सराईत गुन्हेगार आढळले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांना जामीन देताना या गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे. आता हे सराईत गुन्हेगार पुन्हा दारूविक्री करतात का यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टँकरवर डिजिटल लॉकर

राज्यात मद्याका&ची अवैधरीत्या मोठय़ा प्रमाणावर वाहतूक आणि चोरीही होते. एखाद्या टँकरमधून मद्यार्क नेताना मोठय़ा प्रमाणावर चोरीच्या घटना होतात. त्यामुळे मद्यार्क आणि मद्य वाहतूक करणाऱया वाहनांवर डिजिटल लॉक किंवा ई लॉक बसवण्याचे आतापासून सक्तीचे केले आहे. यामुळे टँकरमधून मद्यार्क किंवा ट्रकमधून दारूची चोरी होणार नाही.