शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका, सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन

1967 पासून शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले कडवट शिवसैनिक व पनवेल महानगरपालिका क्षेत्र सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. राजकारणाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय भाग घेणाऱ्या मुंबईकर यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

बाळाराम मुंबईकर हे तळोजा येथील भोईर पाडा येथे राहत होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी त्यांनी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुख पदाचीही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या निधनामुळे निष्ठावान शिवसैनिक हरपल्याची भावना शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी व्यक्त केली.