
ऑपरेश सिंदूरमध्ये हिंदुस्थानने किती विमाने गमावलीत, असा प्रश्न करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या लपवाछपवीमुळे मोदी सरकारच्या अडचणींत वाढ होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकारची दमछाक उडण्याची शक्यता आहे. हल्ल्याआधी पाकिस्तानला याची माहिती देण्यात आली. हा गुन्हा आहे. ही माहिती नेमकी कोणी दिली व या हल्ल्यात आपण किती विमाने गमावलीत, असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे. हल्ल्याची माहिती पाकला दिली होती, अशी कबुली परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. त्यावर निशाणा साधत एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरले आहे.