दि सह्याद्री सहकारी बँकेची आज निवडणूक

कापड बाजारातील माथाडी, हातगाडी कामगारांसाठी नामदेवराव कदम (बापू) यांनी स्थापन केलेल्या दि सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक उद्या, रविवारी होत आहे. मतदान शाखानिहाय होणार असून गेली अनेक वर्षे पुरुषोत्तम माने यांनी बँक सक्षम ठेवली आहे. बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांचा सहकार पॅनलवर ठाम विश्वास असल्याचे दिसत आहे.

सहकार पॅनेलमधून स्वतः पॅनल प्रमुख पुरुषोत्तम माने निवडणूक लढवत असून सहकार पॅनेलमध्ये मल्टिनॅशनल कंपनीचे संचालक असलेले किरण देसाई, सहकारी लेखापरीक्षक आणि सल्लागार अंकुश जाधव, महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष डी. एस. शिंदे, सहकार क्षेत्रात वकिली करणारे किरण निकम, समाजकार्यात अग्रेसर असणारे इस्माईल सय्यद, माथाडी कामगार म्हणून काम करणारे आणि कामगारांशी लोकसंपर्प असलेले हणमंत कदम, बाबुराव कुंभार, संजय किरीगोसावी आणि राम नामदास असे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सहकार पॅनेलचाच विजय होणार अशी चर्चा सभासदांमध्ये आहे.