
रविवारी इस्रायली सैन्याने गाझातील अनेक भागांवर हवाई हल्ले केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये 125 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 2 महिन्यांतील इस्रायलचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. याआधी 18 मार्च रोजी इस्रायली हल्ल्यात 400 हून अधिक लोक मारले गेले होते. गेल्या 4 दिवसांपासून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले तीव्र केले आहेत. या 4 दिवसांत आतापर्यंत अंदाजे 400 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने गाझाचा ताबा घेण्यासाठी 5 मे रोजी ‘गिदियन रॅरियट्स’ लष्करी कारवाई सुरू केली. हमासचा नाश होईपर्यंत ते आपले ऑपरेशन सुरूच ठेवेल, असे इस्रायलचे म्हणणे आहे. मार्च 2025 मध्ये इस्रायलने गाझाला अन्न आणि इंधन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. इस्रायली सरकारने दावा केला की, यामुळे हमास कमकुवत होईल.