
जमिनीच्या हद्दीवरून वाद आणि प्रसंगी हाणामारीच्या घटना घडतात. त्यावर जमिनीची मोजणी करणे हाच उपाय असतो, पण तो गरीब शेतकऱयांना परवडणारा नसतो. त्यामुळे राज्य शासनाच्या महसूल विभागाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये केली जाणार आहे. केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्यात येणार आहेत. यापूर्वी अर्ज दिल्यानंतर सहा महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या साध्या मोजणीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते.