
आठ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. भाग्यश्री विसपुते यांना धुळय़ाचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे, तर शीतल तेली-उगले यांना क्रीडा आणि युवा आयुक्त बनवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले (पीएमओ) नवल किशोर राम यांना पुन्हा पुण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर पुणे महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. पापळकर यांची बदली धुळय़ाच्या जिल्हाधिकारीपदावरून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. सी. के. डांगे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी आशीष येरेकर यांची बदली करण्यात आली आहे. आनंद भंडारी यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले आहे.