
माहुलमधील महापालिकेच्या घरांसाठी आलेल्या 248 अर्जांमधून 330 घरांची विक्री करण्यात आली असून पालिकेच्या 82 कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी दोन घरे खरेदी केली आहेत. 9 हजार 98 घरांमधून केवळ 330 घरांची विक्री झाल्यामुळे उर्वरित घरांच्या विक्रीचा प्रश्न अजूनही बाकी आहे. दरम्यान, ज्यांना घरे लागली आहेत त्यांनी तीन महिन्यांत घराचे पैसे भरून घर ताब्यात घ्यावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील पालिका कर्मचाऱयांसाठी विक्री करण्यात येणाऱ्या घरांची मुदत गुरुवारी, 15 मे रोजी संपली. त्यामुळे आता महापालिकेच्या कर्मचाऱयांसाठी असलेल्या या विशेष सोडतीला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार की, पुन्हा निकषांत बदल केले जाणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मुंबई महापालिकेने मुदतवाढ न देता 20 मे रोजी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोडतीसाठी आलेल्या 248 अर्जांमधून 303 घरांची विक्री झाली.