
कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्षे उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली आहे.
कोकण रेल्वे महामंडळातील राज्य सरकारच्या आर्थिक हिश्श्याची परतफेड आणि विलीनीकरणानंतर ‘कोकण रेल्वे’ हे नाव कायम ठेवणे, या दोन अटी घालून सरकारने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. आता रेल्वे बोर्डाची अंतिम मंजुरी मिळणे बाकी असून ती मंजुरी मिळताच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार आहे.