
कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने’द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या तिसऱया सीझनची घोषणा केली आहे. कपिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून हा नवीन सीझन 21 जून 2025 पासून नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे. या नव्या सीझनमध्ये गुत्थी उर्फ सुनील ग्रोवर याचे पुनरागमन होत आहे. याशिवाय, अर्चना पूरन सिंह, कृष्णा, किकू शारदा हे कलाकार सुद्धा या शोमध्ये दिसणार आहेत. तुम्ही आता हसायचे थांबू शकत नाही. कारण, कपिल आणि त्याची गँग पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे, असे कपिल शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कपिल शर्माच्या या शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.