
मुंबई जिल्हा तिथे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या घोषणेला अनुसरून पालघर, जालना, वर्धा व हिंगोली या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात यंदापासून प्रवेश केले जाणार आहेत. त्यामुळे वैद्यकीयच्या जागांमध्ये यंदा प्रत्येकी 100 याप्रमाणे 400 जागांची भर पडेल. याशिवाय अहिल्यानगर येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय सुरू होणार आहे, मात्र या महाविद्यालयातील प्रवेशांकरिता पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल.
महाराष्ट्रात दहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना होती. त्यानुसार गेल्या वर्षी गडचिरोली, वाशीम, अंबरनाथ, बुलढाणा, भंडारा, अमरावती जिल्ह्यांतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करण्यात आले. यंदा उर्वरित चार म्हणजे पालघर, जालना, वर्धा व हिंगोली येथे प्रवेश केले जाणार आहेत.
राज्यातील जागा 11 हजार 500 वर
याशिवाय यंदापासून सुरू होणारी चार नवीन महाविद्यालये आणि अहिल्यानगर येथील 430 खाटांचे आणि 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धरून राज्यातील वैद्यकीय जागांची संख्या 11 हजार 500 वर जाण्याची शक्यता आहे.