
मुंबई आणि उपनगरात पाऊस सोमवार पहाटेपासून दमदार बॅटिंग करत आहे. या मुसळधार पावसाने तिन्ही मार्गांवरील लोकल विलंबाने धावत आहेत. तसेच अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत भर दिवसा 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास अंधार दाटला. त्याला मुसळधार पावसाची चांगलीच साथ मिळत होती. तसेच मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढत आहे. तर दक्षिण मुंबईतीही अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अंधेरी, वांद्रे, गोरेगावर परिसरात सगळीकडे अंधार झालेला आहे. मुंबईत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. तर पहाटेपासून पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली.
या पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरचे वेळापत्रक कोलमडले. तसेच मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे. तसेच रस्ते वाहतिकही मंदावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने प्रवाशांना वाहचूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. सांताक्रुझ विलेपार्ले,अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या सर्व भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
बोरिवली ते वांद्रे या एका तासाच्या प्रवासासाठी आज दोन ते अडीच तास लागत आहेत. पश्चिम उपनगरात भर दिवसा अंधार दाटल्याने आणि जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन चालक हेडलाईट चालू करून गाड्या चालवत आहेत. तसेच 11.30 वाजण्याच्या सुमारास हाट टाईटचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाकडून सखल भागातील पाणी काढण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.