
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने मुंबईचा 5 विकेटने पराभव करत फायनलच तिकीट कन्फर्म केलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत 41 चेंडूंमध्ये 87 धावा चोपून काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. मुंबईने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने पंजाब बॅकफुटवर फेकली गेली होती. परंतु त्यानंतर कर्णधाराने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. याच मैदानात 3 जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे.





























































