
अयोध्यामधील श्री राम मंदिराच्या शिखरावर सोन्याने मढवलेला कळस स्थापित करण्यात आला असून संपूर्ण मंदिरावर सोनेरी रोषणाईदेखील करण्यात आली आहे. यामुळे मंदिरही सोनेरी असल्याचा भास होत आहे. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. गुरुवारी राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठsसह सात मंदिरांची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही रोषणाई करण्यात आली आहे. आजपासून या सोहळय़ाला दिमाखात सुरुवात झाली.