
देशातील एकूण विद्यार्थ्यांमधील तब्बल 60 टक्के विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसॉर्स सेंटर संस्थेने सर्वेक्षण करून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 22.5 टक्के विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळत नाही. 65.7 टक्के मुलांमध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. यामुळेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. कमी झोप मिळाल्यामुळे एकाग्रता, भावनिक संतुलन आणि अभ्यासाच्या कामगिरीवरदेखील वाईट परिणाम होतो.