लाचखोर अधिकाऱ्याच्या कोठडीतील चौकशीसाठी सीबीआयची याचिका

हॉटेलच्या मालकी हक्काचा वाद मिटवण्यासाठी व्यावसायिकाकडून तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या राष्ट्रीय पंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी)च्या उपनिबंधकांची कोठडीतील चौकशीसाठी सीबीआयने सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

सीबीआयने 29 मे रोजी उपनिबंधक चरण प्रताप सिंह आणि त्यांचे कथित सहकारी करसन गणेश अहिर यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली. सीबीआयने त्याच दिवशी दोघांनाही न्यायालयासमोर हजर करत त्यांच्या रिमांडची मागणी केली. तथापि, न्यायालयाने सीबीआयला दोघांची कोठडी नाकारली होती. लाचखोरी प्रकरणात एनसीएलटीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित सहभागाबद्दल चौकशीची आवश्यकता असल्याचे सांगत सीबीआयने त्यांच्या रिमांडसाठी नवीन याचिका दाखल केली आहे.