2 लाखांची लाच घेताना स्वच्छता निरीक्षकाला एसीबीकडून अटक

खासगी आस्थापनासाठी हेल्थ लायसन्स देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितली. त्यापैकी दोन लाख रुपये घेताना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक सरबजीत सिंह करतारसिंह बाजवा ट्रॅप झाले.

तक्रारदार यांची खासगी कंपनी असून ते व्यावसायिकांना हेल्थ लायसन्स, इमारत परवानगी काढून देण्याकरिता सल्लागार म्हणून काम करतात. सांताक्रुझ येथील एका ग्राहकाच्या आस्थापनेसाठी हेल्थ लायसन्सची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी महानगर पालिकेच्या एच/पूर्व विभागात अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्यासाठी बाजवा यांनी 3 लाखांची मागणी केली होती.