
अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला चारकोप पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पीडित मुलगी ही चारकोप परिसरात राहते. तिच्या आईवडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ नातेवाईक करतात. दोन दिवसांपूर्वी ती मुलगी घराबाहेर गेली होती. तेव्हा तोंडओळख असलेल्या वृद्धाने तिला रस्त्यात थांबवले. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. त्या कृत्यामुळे मुलगी घाबरली. तिने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी वृद्धा विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. त्याला अटक करून विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते.