
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे नेटवर्क आज दुपारी अचानक डाऊन झाले. यामुळे इंटरनेट, कॉल ड्रॉपसह फायबर इंटरनेट असलेल्या ग्राहकांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागला. जिओचे नेटवर्क डाऊन होताच हजारो युजर्संनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला. दुपारपर्यंत डाऊन डिटेक्टरवर जवळपास 11 हजारांहून अधिक युजर्संनी तक्रारी नोंदवल्या. मोबाइल कनेक्टिव्हिटीमुळे युजर्स त्रस्त असून 56 टक्के ग्राहकांनी मोबाइल इंटरनेटसंबंधी समस्या नोंदवल्या. 22 टक्के युजर्संना जिओ फायबरच्या सेवेत समस्या उद्भवली.